देशभरात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर बर्‍याच जणांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान,फोर्टिस हेल्थकेअरने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोविड-१९ वरील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी राहून उपचार घेतले आणि त्यातून बरे झाले.

कोव्हीड -१९ संसर्गावर लसींची भूमिका आणि तीव्रता समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. कोविड -१९ लसीकरणानंतही अनेकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पूर्ण लसीकरणानंतर त्यांना आयसीयू केअर / व्हेंटिलेटर गरज लागली होती असे या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासात सुमारे १६,००० आरोग्य कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले गेले. त्यांना यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान लसचा पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिले गेले होते. या कालावधीत करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज ३.५ ते ४ लाख रुग्णांची नोंद होत होती. त्याच दरम्यान आरोग्य कर्मचारी २४ तास रुग्णांना बरे करण्यासाठी झटत होते.

Covid 19: महाराष्ट्रात पुढच्या दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आयसीयू केअर / व्हेंटिलेटर गरज

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कमीतकमी ९२ टक्के आरोग्य कर्मचारी (१६,०००) ज्यांचे पूर्णपणे लसीकरण केले गेले त्यांना गंभीर लक्षणे दिसली नाहीत. दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ सहा टक्के कर्मचार्‍यांना संसर्ग झाला असे अभ्यासातून समोर आले आहे. संपूर्ण लसीकरणानंतर ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांच्यापैकी ९२ टक्के कर्मचाऱ्यांना सौम्य संसर्ग झाला होता आणि सात टक्के कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनचा सपोर्ट द्यावा लागला. फक्त एक टक्का गंभीर लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना आयसीयू केअर / व्हेंटिलेटर गरज लागली होती.

लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून कमीतकमी ५०६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सार्स-सीओव्ही -२ची लागण झाली होती. लसीचा पहिला डोस मिळालेल्या ७,१७० पैकी १८४ (२.६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दुसऱ्या डोसनंतर एकूण ३,६५० आरोग्य कर्मचार्‍यांपैकी ७२ (२ टक्के) कर्मचाऱ्यांची चाचणी सकारात्मक आली.

दुसऱ्या डोसच्या १४ दिवसानंतर करोनाची लक्षणे

आरोग्य कर्मचाऱ्यांनुसार दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसच्या १४ दिवसानंतर करोनाची लक्षणे जाणवू लागली. यामध्ये लक्षणे असलेल्यांची संख्या १.६ टक्के (३,००० आरोग्य कर्मचार्‍यांपैकी ४८) होती. दुसरा डोस घेतल्यानंतर इन्फेक्शनपर्यंतचा मध्यम कालावधी २९.५ दिवसांचा होता.

एप्रिलमध्ये झालेला हा प्राथमिक अभ्यास होता, जेव्हा दुसरी लाट आली नव्हती आणि आता ७०-७५ टक्क्यांहून अधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना लसी देण्यात आल्या होत्या. त्या काळातील बदल समजून घेण्यासाठी आणखी एक अभ्यास आणि विश्लेषण करण्याची गरज आहे. आणि जमा झालेल्या पुराव्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. अधिक वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयांनी संसर्ग आणि लसींशी संबंधित नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. सध्या पंजाब, एक राज्य म्हणून, अधिक समजून घेण्यासाठी लसीकरणाच्या आकडेवारीकडे पाहात आहोत, ”असे प्राध्यापीका लक्ष्मी यांनी सांगितले.