02 March 2021

News Flash

श्रीनगरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, तीन जखमी

पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काश्मीर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला.

| June 24, 2013 06:26 am

पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काश्मीर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. श्रीनगर शहराबाहेर असलेल्या बेमिनाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लष्कराच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
तीन जवानांना गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर दहशतवादी काळ्या रंगाच्या काचा असलेल्या एका गाडीतून पळून गेले. घटनास्थळी येण्यासाठी काही दहशतवाद्यांनी मोटारसायकलचा वापर केला होता. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 6:26 am

Web Title: militants attack army convoy in srinagar ahead of pms visit 3 jawans injured
टॅग : Terrorist Attack
Next Stories
1 स्नोडेनला हाँगकाँगबाहेर जाऊ देण्यात चीनची मोठी भूमिका
2 एकाच मांडवात केले दोन मुलींशी लग्न!
3 आणखी एक मिग कोसळले, वैमानिक सुरक्षित
Just Now!
X