News Flash

सोमालियातील संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात सात ठार

सोमालियामधील संसदेवर आज (शनिवार) येथील दहशतवाद्यांनी हल्ला केला.

| May 24, 2014 04:27 am

सोमालियामधील संसदेवर आज (शनिवार) येथील दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सातजण ठार झाल्याच वृत्त आहे. ठार झालेल्यांमध्ये सहा दहशतवादी आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे.
संसदेच्या इमारतीवर कारबॉंबिंग, आत्मघातकी दहशतवादी व इतर दहशतवाद्यांच्या सहाय्याने मोठा हल्ला करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. संसदेच्या इमारतीजवळ जोरदार गोळीबार व बॉंबस्फोटही करण्यात आला. संसदेच्या इमारतीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी अडकले आहेत. येथे सुरु असलेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान दिले; तर एक आत्मघातकी दहशतवादी व कारमधून बॉंबस्फोट करणारा दहशतवादीही ठार झाले आहेत. अद्यापी या भागामध्ये अजून दहशतवादी असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 4:27 am

Web Title: militants attack parliament building in somalia
Next Stories
1 व्हिडिओ: देव तारी त्याला…
2 अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला
3 शरीफ यांनी शपथविधीला उपस्थित राहावे
Just Now!
X