पाकिस्तान देशाचे संस्थापक महंमद अली जिना यांचे बलुचिस्तानमधील १२१ वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक घर दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केले. क्वेट्टा शहरापासून १२० किमी अंतरावर असलेल्या झियारत येथे महंमद अली जिना यांचे ‘कैद-ए-आझम रेसिडन्सी’ हे ऐतिहासिक घर आहे. यावर दहशतवाद्यांनी आज पहाटे दीडच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिसही ठार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब हल्ल्यामुळे घरातील सर्व लाकडी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.