04 March 2021

News Flash

जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

दहशतवाद्यांनी स्फोटाच्या माध्यमातून लष्कराच्या वाहनाचे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्वरीत दहशतवाद्यांवर गोळीबार केला.

नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच म़त्यू झाला तर उर्वरित मुले जखमी आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला करण्याचे सूत्र अवलंबले आहे. मंगळवारी सकाळी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. हा हल्ला पुलवामा येथील नौपारा परिसरात झाला.

दहशतवाद्यांनी स्फोटाच्या माध्यमातून लष्कराच्या वाहनाचे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटानंतर जवानांनी त्वरीत दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यादरम्यान दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. आता दहशतवादी सामान्य नागरिकांशिवाय सुरक्षा दलांवरही निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक सुरक्षा दल आणि पेट्रोलिंग पार्टींवर हल्ले वाढले आहेत. २४ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी अनंतनाग येथे जवानांवर हल्ला केला होता. यादरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 9:07 am

Web Title: militants ied blast on army vehicle at pulwama jammu kashmir
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 कमाईमध्ये ‘जिओ’ देशात दोन नंबर, व्होडाफोनला टाकलं मागे
3 थकीत कर्जाची समस्या ही यूपीए सरकारची देणगी, अरूण जेटलींचा हल्लाबोल
Just Now!
X