News Flash

इराकमध्ये निवडणूक उमेदवाराचे अपहरण

इराकमध्ये सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवाराचेच अपहरण करण्यात आले आहे. शिया पंथीय असलेल्या या उमेदवाराचे बगदादमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे.

| May 19, 2014 06:10 am

इराकमध्ये सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवाराचेच अपहरण करण्यात आले आहे. शिया पंथीय असलेल्या या उमेदवाराचे बगदादमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या या निवडणुकीतील मतदानाचा सोमवारी निकाल लागणार होता, तत्पूर्वीच या उमेदवाराचे अपहरण करण्यात आले.
रहमान अब्दुलझाहरा अल-जाझिरी असे या उमेदवाराचे नाव असून, उत्तर बगदादमधील जमिला भागातील त्याच्या निवासस्थानातून दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. गोळीबार करत दहशतवादी त्याच्या घरात घुसले होते. या गोळीबारात जाझिरी यांचे वडील व भाऊ जखमी झाले.
जाझिरी हे हेजबोल्ला वारिथून या पक्षाचे सरचिटणीस आहेत. इराकमधील हेजबोल्ला पक्षातून फुटून हा नवा पक्ष स्थापन करण्यात आला होता. या अपहरणामागे कुणाचा हात आहे, हे सांगता येणार नाही. मात्र अपहरणकर्त्यांना ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घ्यावी, असे या पक्षाकडून सांगण्यात आले. इराकमध्ये प्रथमच निवडणूक काळात उमेदवाराच्या अपहरणाची घटना घडली आहे. आतापर्यंत राजकीय सभा आणि उमेदवारांवर हल्ले झाले, मात्र अपहरणाची घटना घडली नव्हती,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 6:10 am

Web Title: militants kidnap iraq election candidate in baghdad
Next Stories
1 चीनचे व्हिएतनामशी द्विपक्षीय कार्यक्रम रद्द
2 ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत हिंदूजा बंधू पहिल्या क्रमांकावर
3 किमान निवृत्तिवेतन एक हजार रुपये लवकरच
Just Now!
X