सीरियातील असाद शासनाने बंडखोरांविरुद्ध गेल्या आठवडम्यात रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचे आरोप झाल्यानंतर, या सीरियाप्रश्नाने आशियाचेच नव्हे तर जागतिक राजकारण ढवळून निघाले आह़े एकीकडे अमेरिकेने सीरियावर लष्करी कारवाईची तयारी चालविली असताना रशियासह अनेक आशियाई देशांनीही त्याला विरोध दर्शविला आह़े  त्यातच अमेरिकेचे कायदेमंडळही या कारवाईसाठी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आल्याने ओबामा शासन पेचात सापडले आह़े  या सर्व शहकाटशहाच्या राजकारणामुळे सध्या सीरियाप्रश्न जागतिक स्तरावर पेटला आह़े
अमेरिका कारवाई करणार?
वॉशिंग्टन : सीरियाविरुद्ध लष्करी कारवाईचा अमेरिकेकडून विचार करण्यात येत असला तरीही याबाबत राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना देशांतर्गतच कठोर विरोधाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत़  कारण सीरियाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ओबामांनी अमेरिकी कॉंग्रेसची रितसर परवानगी घ्यावी, मागणी  रिपब्लिकन आणि डेमोकॅटिक अशा दोन्ही पक्षाच्या अनेक सदस्यांकडून करण्यात येत आह़े  कोणत्याही लष्करी कारवाईपूर्वी कॉंग्रेसची परवानगी घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र ओबामांना पाठविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी स्कॉट रिगेल्ल यांनी सभागृहात इतर सदस्यांची मने वळविण्याचा प्रयत्न केला़  सिनेटमध्येही ज्या सदस्यांचा सीरिला शासन करण्याला पाठिंबा होता, तेसुद्धा राष्ट्राध्यक्षांनी आधी काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा असे म्हणू लागले आहेत़
रशियाचा विरोध
सीरियाचे अध्यक्ष असाद यांच्या शासनाने रासायनिक अस्त्रांच्या वापराचा पुन्हा इन्कार केलेला असताना, पश्चिमेतील देशांनी लष्करी कारवाई केल्यास मध्य-पूर्वेतील वातातवरण पूर्णत: अस्थिर होईल, असा इशारा रशियाने बुधवारी दिला़  अमेरिकेकडून सीरियावर हल्ल्याची शक्यता वाढत आह़े  रशियाचा मात्र त्याला विरोध आह़े  त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले जाण्याची शक्यता आह़े
संयुक्त राष्ट्राकडून चौकशी सुरू
असाद लष्कराने रासायनिक अस्त्रे वापरल्याच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा चमूने आपली चौकशी बुधवारपासून सुरू केली़  मंगळवारी सुरक्षेच्या कारणास्तव ही चौकशी मोहीम थांबविण्यात आली होती़  सहा गाडय़ांमधून शस्त्रतज्ज्ञांचा एक चमू दमास्कसमध्ये उतरल्याचे सांगण्यात येत़े  परंतु, ते कोणत्या जागेला भेट देणार आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही़  या चमूने सोमवारी चौकशी सुरू केल्यानंतर बंदुकधाऱ्यांनी गोळीबाराला सुरुवात केली होती़  तरीही त्यांनी मोदामियेत अल-शाम येथील दोन रुग्णालयाची तपासणी केली आणि तेथील रासायनिक अस्त्राच्या वापराचे पुरावे गोळा केल़े
प्रादेशिक स्थर्याला धोका
तेहरान : इराणचे मित्रराष्ट्र असलेल्या सीरियावर कोणत्याही पाश्चिमात्य देशाने लष्करी कारवाई केल्यास, त्यामुळे प्रादेशिक स्थर्य आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा इशारा इराणचे संरक्षणमंत्री हुसेन देहक्वान यांनी बुधवारी दिला आह़े लष्करी कारवाई सीरियातील हिंसाचाराला खतपाणी घालणाऱ्यांच्याही लाभाची ठरणार नाही, असे मत व्यक्त करीत देहक्वान यांनी सीरियातील बंडखोरांना पाठबळ देणाऱ्या पाश्चिमात्य देशांना टोलाही लगावला आह़े  दमास्कसच्या बाहेरील भागात असाद लष्कराकडून गेल्या आठवडय़ात रासायनिक शस्त्र वापरण्यात आल्याच्या संशयावरून पाश्चिमात्य देश सीरियावर लष्करी कारवाईच्या तयारीत आहेत़  त्याविरोधात असाद शासनाचे प्रमुख प्रादेशिक मित्रराष्ट्र असलेल्या इराणकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत़  इराक आणि अफगाणिस्तानमधील लष्करी कारवाईचा अनुभव अमेरिकेला पुन्हा नवी चूक करून आणखी एका अरिष्ट ओढावून घेणार नाही, असा अंदाजही देहक्वान यांनी व्यक्त केला़
सत्तापालटासाठी कारवाई नाही
वॉशिंग्टन : रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याच्या आरोपांमुळे सीरियाविरुद्ध लष्करी कारवाई करण्याबाबत अमेरिका विचार करीत असली, तरीही या कारवाईने सत्तापालट करण्याचा अमेरिकेचा अजिबात विचार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आह़े  आम्ही सीरियाबाबत ज्या पर्यायाचा विचार करीत आहोत, तो सत्ता पालटासाठी नाही़  
तर रासायनिक अस्त्रांच्या वापरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लादण्यात आलेल्या र्निबधाचा सीरियाकडून भंग करण्यात आल्यामुळे प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात येत आह़े  त्यातही या झगडय़ाचा शेवट राजकीय चर्चेतून होऊ शकेल, असा आमचा विश्वास आहे, असे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव ज्ये कार्ने यांनी सांगितल़े  सत्तेवर राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष असाद यांच्याकडून विरोधकांचे शिरकाण करण्यात येत आह़े  म्हणूनच आम्ही या प्रकरणात लक्ष घालित आहोत़  आणि आम्हाला हे पक्के ठाऊक आहे की, सीरिया भविष्यात असाद यांना सत्तेवर राहू देणार नाही, असेही ते म्हणाल़े  याबाबत राष्ट्राध्यक्ष आणि त्यांना चमू योग्य निर्णय घेईल आणि योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाल़े