11 December 2017

News Flash

कमल हासनच्या छबीवर दुग्धाभिषेक

गेल्या पंधरवडय़ापासून देशभरात वादग्रस्त ठरलेला कमल हासनचा महत्त्वाकांक्षी ‘विश्वरूपम’ हा चित्रपट तामिळनाडूतील चित्रपटगृहांत गुरुवारी

पीटीआय, चेन्नई | Updated: February 8, 2013 4:23 AM

‘विश्वरूपम’ला तामिळनाडूत जोरदार प्रतिसाद

गेल्या पंधरवडय़ापासून देशभरात वादग्रस्त ठरलेला कमल हासनचा महत्त्वाकांक्षी ‘विश्वरूपम’ हा चित्रपट तामिळनाडूतील चित्रपटगृहांत गुरुवारी दिमाखात झळकला. कमलच्या या चित्रपटाचे त्याच्या चाहत्यांनी सर्वत्र जल्लोषात स्वागत केले. ‘स्पाय-थ्रिलर’ म्हणून ओळख असलेला ‘विश्वरूपम’ तामिळनाडूतील काही चित्रपटगृहांत तर सकाळी ६.०० वाजता प्रदर्शित करण्यात आला.
‘विश्वरूपम’ हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपट रसिकांनी सकाळपासूनच सिनेमागृहांवर गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात नाचत, फटाके फोडून सिनेमागृहातील पडद्यांवर ‘विश्वरूपम’ दिमाखात झळकला. काही ठिकाणी सिनेमागृहाबाहेरील ५८ वर्षीय कमल हासनच्या कटआऊटस्वर दुग्धाभिषेकही करण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘विश्वरूपम’चे सोमवापर्यंतचे सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. कमल हासनने या चित्रपटात उत्तम कामगिरी बजावली असल्याचे एका चित्रपटगृहाच्या मालकाने  सांगितले.
या चित्रपटातील तांत्रिक थरार हा हॉलीवूडच्या चित्रपटांशी स्पर्धा करेल इतका उत्तम आहे. कमलने भारतीय चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया एका चित्ररसिकाने दिली.

First Published on February 8, 2013 4:23 am

Web Title: milk coronation on kamal hasan image