03 June 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारूच्या बाटल्या, राष्ट्रपती भवनजवळ पोलिसांनी केली अटक

करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू

(संग्रहित छायाचित्र)

करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रेशन दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, मेडिकल अशा आवश्यक सेवा सोडल्या तर अन्य सर्व दुकाने बंद आहेत. दारुची दुकानेही बंद आहेत. अशात राजधानी दिल्लीमध्ये दुधाच्या कॅनमधून दारुच्या बाटल्या नेणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीये. सोमवारी रात्री १२.३० च्या सु्मारास राष्ट्रपती भवनजवळ पोलिसांनी या तरुणाला अटक केली.

अटक करण्यात आलेला तरुण बुलंदशहरचा रहिवासी असून बॉबी चौधरी असे त्याचे नाव आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्याने दारुच्या बाटल्या आणल्या होत्या अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीच्या साउथ एव्हेन्यू पोलिसांनी या तरुणाला सोमवारी रात्री १२.३० च्या सु्मारास पकडले. इतक्या रात्रीच्या वेळी दुचाकीवर दुधाच्या कॅन पाहून शंका आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने गाडीचा वेग वाढवला. अखेर त्याचा पाठलाग करुन राष्ट्रपती भवनजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळील चार दुधाच्या कॅनमधून सात दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सोबतच त्याची दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे. त्या तरुणाने गुरूग्राम येथून दारु विकत घेतली पण परत जाताना रस्ता चुकला, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

दरम्यान, लॉकडाउनमुळे दारुची दुकाने बंद असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत दारुच्या दुकानांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 9:32 am

Web Title: milkman arrested for carrying liquor bottles in milk cans in delhi sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 १६० कि.मी प्रती तास वेगाने चालवत होता Lamborghini, पोलिसांनी अडवलं तर म्हणाला, “करोनाच्या चाचणीसाठी चाललोय”
2 तो कुत्र्याला शिकवत होता गाडी; पोलिसांनी अटक केली तेव्हा…
3 उद्वव ठाकरेच नाही त्यांचे मित्रही उतरले करोनाविरूद्धच्या लढ्यात
Just Now!
X