01 October 2020

News Flash

“सरकारने चीनकडून ५५२१ कोटी घेणं हा शहीदांचा अपमान”; ओवेसींचा हल्लाबोल

"हेच का ते सडेतोड उत्तर", ओवेसींचा सवाल

भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेंसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हेच का ते सडेतोड उत्तर,” असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“१५ जून रोजी चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले. ते अत्यंत निर्दयी होतं. त्याच्या चार दिवसांनंतर १ जून रोजी चीनकडून ५ हजार ५२१ कोटी रूपये घेऊन चीनला जशास तसं उत्तर दिलं. आपल्या जवानांच्या बलिदानाचा हा अपमान आहे,” असं ओवैसी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- राजनाथ सिंहांचं लोकसभेतलं भाषण म्हणजे ‘घिनौना मजाक’-ओवेसी

भारतीय कंपन्यांमध्ये त्यातही स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, हा दावा खरा आहे का असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये भारतातील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूक आहे. एप्रिल २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत चीनने भारतीय कंपन्यांमध्ये १.०२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सरकारने म्हटलं आहे.

आणखी वाचा- “हे स्पष्ट झालंय की, मोदीजींनी देशाची दिशाभूल केली”; राहुल गांधींचे मोदींना दोन सवाल

चीनने गुंतवणूक केलेल्या या १६०० कंपन्या ४६ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आहेत. यामध्ये वाहन उद्योग, पुस्तक छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि वीज उपकरणांच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना चीनमधून १० कोटी डॉलरपेक्षा अधिक निधी एफडीआयच्या माध्यमातून मिळाला आहे.

चीनकडून सर्वाधिक गुंतवणूक ही वाहन उद्योगाला मिळाली आहे. वाहन उद्योगाच्या माध्यमातून मागील चार वर्षात चीनने भारतात १७.२ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर सेवा देणाऱ्या क्षेत्रामध्ये (सर्व्हिसेस) चीनने १३ कोटी ९६ लाख ५० हजार डॉलरची गुंतवणूक केली आहे. केंद्रीय राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी चीनकडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती कॉर्पोरेट मंत्रालयाकडे नसते असं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 3:01 pm

Web Title: mim leader asaduddin owaisi criticize government china investment lok sabha answer jud 87
Next Stories
1 “लॉकडाउनमुळे देशाला नक्की काय फायदा झाला?”; राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला प्रश्न
2 मोठी दुर्घटना : ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत उलटली, तीन मृतदेह हाती लागले
3 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले का? सुप्रीम कोर्टानं राज्यांकडे मागवली माहिती
Just Now!
X