News Flash

आजपासून एसबीआय ग्राहकांसाठी हे तीन नियम बदलणार

एसबीआयच्या तीन बदलांबाबत माहिती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जर तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 1 एप्रिल म्हणजे आजपासून तुमच्यासाठी काही गोष्टी बदललेल्या असतील. एसबीआयने ग्राहकांसाठी आणलेल्या तीन बदलांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मिनिमम बॅलेन्स –
बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो.

चेकबुक – स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचं चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावं असं एसबीआयने सांगितलं होतं. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आलं आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं आहे.

इलेक्टोरल बॉन्ड: देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 8:54 am

Web Title: minimum balance charge changes for sbi customers from april 1
Next Stories
1 लातुरात मुलीला नाव दिले ‘स्वच्छता’ !
2 मालवणच्या किनाऱ्यावर आढळला ३० फुटांचा अजस्त्र देवमासा मृतावस्थेत
3 VIRAL : नावातच बरंच काही आहे! ‘या’ गावांतील लोकांना पाहता येणार फ्री पॉर्न
Just Now!
X