मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने आज(सोमवार) कडक भूमिका घेत, तब्बल २५० ट्विटर हॅण्डल्सवर ब्लॉक करण्याता आले आहेत. या अकाउंट्सवर शेतकरी आंदोलना दरम्यान पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह ट्वटि व हॅशटॅग चालवल्या गेल्याचा आरोप आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आय़टी मंत्रालयाने ट्विटरला जवळपास २५० ट्विट्स/ ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. मंत्रालयाचे म्हणणे होते की हे अकाउंट्स ३० जानेवारी रोजी #ModiPlanningFarmerGenocide हॅशटॅगचा वापर करत होते आणि खोटी, घाबरवणारी व भडकाऊ ट्विट करत होते.

हे गृहमंत्रालय व व कायद्याशी निगडीत संस्थांच्या सांगण्यानुसार करण्यात आले. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही. हिंसाचारासाठी भडकावणं सार्वजनिक व्यवस्थेसाठी मोठा धोका आहे आणि यासाठीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालायने हे ट्विटर अकाउंट्स आणि ट्विट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले.

जे ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये, किसान एकता मोर्चा, द कारवान, मानिक गोयल, Tractor2twir आणि Jatt_junction साऱख्या अकाउंट्सचा समावेश आहे. असे देखील सांगितले जात आहे की, केंद्र सरकारने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत ट्विट करणाऱ्या या अकाउंट्सबाबत ट्विटरला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नंतर ट्विटर करून हे पाऊल उचलले गेले असल्याचे सांगितले जात आहे. आयटी मंत्रालयाने या ट्विटर अकाउंट्सना आयटी अॅक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत ब्लॉक करण्यास सांगितले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर ट्विटर अशा अकाउंट्सच्या शोधात आहे, जे शेतकरी आंदोलनाबाबत अफवा पसरवणारे व भडकाऊ असे ट्विट करत आहेत. जे अकाउंट्स ब्लॉक करण्यात आलेले आहेत, ते उघडून पाहिल्यावर दिसत आहे की, सरकारकडून कायदेशीर अपील करण्यात आल्यानंतर हे अकाउंट ब्लॉक केले गेले आहेत.