News Flash

दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट

विजय चौकवर बिटिंग रिट्रिट सोहळा सुरु असताना घडली घटना.

मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटाची तीव्रता फारच कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून, यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्ब स्फोट झाला. विजय चौकवर बिटिंग रिट्रिट या सोहळयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित आहेत.

IEDच्या स्वरुपातील ही स्फोटकं प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 6:37 pm

Web Title: minor blast near israel embassy sparks scare in delhi dmp 82
Next Stories
1 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मिळालं २,५०० कोटीचं कंत्राट
2 ठरलं… मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार
3 ‘तुम्हाला लाज वाटत नाही?’ दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना ‘सिक्रेट’ उघड करण्याची धमकी
Just Now!
X