30 October 2020

News Flash

धक्कादायक! अल्पवयीन अंध मुलीवर अंध शिक्षकांकडून बलात्कार

दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अल्पवयीन अंध विद्यार्थिनीवर अंध शिक्षकांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. यामधील एका शिक्षकाचं वय ६२ आहे. १५ वर्षीय अल्पवीयन मुलीवर जवळपास चार महिने बलात्कार करण्यात आला. अंबाली येथील मंदिरात एका खासगी संस्थेकडून शाळा चालवली जात असून तिथेच हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मावशीच्या घऱी गेली होती. यावेळी तिने मावशीला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलीने आठवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेतलं होतं. यानंतर संगीताचे धडे घेण्यासाठी तिने शाळेत प्रवेश घेतला होता. शाळेच्या हॉस्टेलमध्येच ती राहत होती.

सुट्टी संपल्यानंतरही मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याने कुटुंबातील सदस्यांना शंका आली. यानंतर तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शाळेतील शिक्षक चमन ठाकोर (६२) आणि जयंती ठाकोर (३०) यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीने कुटुंबीयांना सांगितलं.

४ नोव्हेंबर रोजी मुलीच्या मावशीने दाखल केलेल्या तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी जयंती ठाकोर याने दोन महिन्यांपूर्वी म्युझिक रुममध्ये मुलीवर बलात्कार केला. यानंतर तीन दिवसांनी चमन ठाकोर याने त्याच रुममध्ये मुलीवर बलात्कार केला. यानंतर जयंती याने नवरात्री सुरु होण्याच्या एक दिवस आधी पुन्हा मुलीवर बलात्कार केला.

आपण शाळेतील इतर तीन शिक्षकांना यासंबधी सांगितलं त्यानतंर हा प्रकार थांबला असं मुलीने सांगितलं. “आम्ही तपास सुरु केला असून फरार आरोपी शिक्षकांना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न आहेत,” अशी माहिती पोलीस निरीक्षक जे बी अग्रवात यांनी दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही शिक्षकांना शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:37 pm

Web Title: minor blind girl raped by blind teachers in gujarat sgy 87
Next Stories
1 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, शिक्षिकाच प्रियकराला करत होती मदत
2 प्रदूषण वाढलं; वाराणसीत देवी-देवतांच्या मूर्तींना घातले मास्क
3 रेल्वेतील नोकरीसंदर्भातील जाहिरातीमध्ये एक चूक झाली अन् गेली एचआरची नोकरी
Just Now!
X