18 September 2020

News Flash

अल्पवयीन मुलाकडून टॅक्सीचालकाची हत्या

उबेरची टॅक्सी भाडय़ाने घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाने टॅक्सीचालकाची गोळ्या घालून हत्या केली

उबेरची टॅक्सी भाडय़ाने घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाने टॅक्सीचालकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उशिरा रात्री राजधानीत घडली.
पश्चिम दिल्लीतील मुंडका येथील एका शेतात चालक कुलदीप ठाकूर याचे प्रेत आढळल्यानंतर या खुनाचा मागोवा घेत पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १६ वर्षे व १७ वर्षे वय असलेल्या दोन मुलांना अटक केली. ही मुले एका सरकारी शाळेत अकरावीत शिकतात. ठाकूर त्याच्या पुतण्यासह अँड्रय़ूज गंज भागात राहत होता आणि तो उबेर व ओला या दोन्ही कंपन्यांशी संलग्न होता. उबेरमार्फत ठाकूरने केलेल्या शेवटच्या बुकिंगचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांना नजफगढ भागातून अटक केली. बुधवारी टॅक्सी भाडय़ाने घेणाऱ्या या मुलांचे कुठे जायचे हे निश्चित नव्हते. त्यांनी चालकाला नजफगढ भागातच फिरत राहण्यास सांगितले. चालकाने याला हरकत घेतल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. काही वेळातच दोन मुलांपैकी एकाने ठाकूरवर तीन वेळा गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी ठाकूरचा मृतदेह एका निर्जन भागात फेकून दिला आणि कारमधून पळून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:08 am

Web Title: minor child murdered taxi driver
Next Stories
1 भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी येडियुराप्पा
2 एका व्यक्तीकडे सर्व अधिकार नकोत!
3 टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील कारभाराची चौकशी
Just Now!
X