News Flash

भयंकर! अल्पवयीन मुलीवर ७ जणांनी केला बलात्कार, आत्महत्या करत संपवलं जीवन

पीडितेच्या वडिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

(संग्रहित छायाचित्र)

देशाला हादरवून सोडणारी हाथरसच्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच छत्तीसगढमध्ये सामूहिक बलात्काराची भयंकर घटना घडली आहे. घटनेनंतर पीडितेनं आत्महत्या करत जीवन संपवलं. तर पीडितेच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उजेडात आला. पीडिता नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यावर जंगलात नेऊन अत्याचार करण्यात आला.

पीडिते मुलगी नातेवाईकांच्या घरी असलेल्या लग्नासाठी शेजारच्या गावात गेली होती. यावेळी तिला काही जणांनी उचलून जंगलात नेलं. त्याठिकाणी आणखी काही आरोपी आले. या ७ जणांनी मिळून तिच्या काही तास अत्याचार केले. त्याचबरोबर घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. या घटनेची माहिती फक्त पीडितेच्या एका मैत्रिणीला होती.

“छत्तीसगढमधील कोंडगाव जिल्ह्यात ही घटना घडली. नातेवाईकांकडे लग्न असल्यानं अल्पवयीन पीडिता जवळच्या गावात गेली होती. लग्नाला गेल्यानंतर मद्यपान केलेल्या दोघांनी अल्पवयीनं मुलीला जबरदस्तीन जंगलात नेलं. तिथे आणखी पाच जण आले. सात जणांनी मिळून पीडितेवर काही तास अत्याचार केले,” अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

“आरोपींनी अत्याचार केल्यानंतर तिला पुन्हा लग्नाच्या ठिकाणी आणून सोडलं. मात्र, ती या घटनेनं हादरून गेल्यानं शांत होती. त्यानंतर ती आपल्या वडिलांना न सांगता घरी परतली. घरी परतल्यानंतर पीडितेनं आत्महत्या केली. ही घटना २० जुलै रोजी घडली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही विचारणा केली होती,” अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.

“बरेच दिवस लोटल्यानंतर पीडितेच्या मैत्रिणीनं घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. तिच्या सामूहिक बलात्कार झाला होता, अशी माहिती मैत्रिणीनं पीडितेच्या कुटुंबीयांना दिली. हे ऐकून तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. पीडिता अगोदर मरण पावली असल्यानं घटनेचा पाठपुरावा करता येईल की, नाही याबद्दल त्यांना माहिती नव्हती. कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं व पोलिसांपर्यंत पोहोचलेच नाही. दोन महिने उलटल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी मयत पीडितेच्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पीडितेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार असून, मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे,” असं पोलीस महानिरीक्षक म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 2:35 pm

Web Title: minor girl kills self after gang rape by 7 father attempted suicide bmh 90
Next Stories
1 देशात २४ बोगस विद्यापीठं; नागपूरमधील एका विद्यापीठाचा समावेश, पाहा संपूर्ण यादी
2 दिल्लीत रात्रंदिवस रेस्तराँ उघडी राहणार
3 पुढचं दशक आव्हानात्मक, पण … ; हवाईदल प्रमुखांनी व्यक्त केला विश्वास