News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याची जमावाकडून हत्या

आरोपीला रुग्णालयात नेलं जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला

संग्रहित छायाचित्र

जालंधर येथे ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३९ वर्षीय आरोपीची जमावाने मारहण करत हत्या केली आहे. रामा मंडी परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. आरोपीला मारहाण होत असताना पोलिसांनी सुटका केली. जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत असताना आरोपीने शेजाऱ्याच्या घरात घुसखोरी केली होती. यावेळी मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीचे आई-वडील कामानिमित्र घराबाहेर गेले होते. पीडित मुलगी आणि कुटुंब मुळचं नेपाळचं आहे.

मुलगी जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज ऐकून इतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचं त्यांनी पाहिलं. आरोपी अद्यापही घरामध्येच होता. शेजाऱ्यांनी त्याला पकडलं आणि अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.

‘शेजारी पोहोचले तेव्हा मुलीची अवस्था वाईट होती. बलात्कार केला तेव्हा आरोपी दारुच्या नशेत होता. पोलीस पोहोचले तेव्हा आरोपी जखमी झाला होता. पोलिसांनी पीडित मुलगी आणि आरोपीला सिव्हिल रुग्णालयात नेलं, पण पोहोचण्याआधीच आरोपीचा मृत्यू झाला’, अशी माहिती पोलीस सहाय्यक आयुक्त हरसमित सिंग यांनी दिली आहे.

घटनास्थळाचा एक व्हिडीओही समोर आला आहे जिथे पोलीस आरोपीला पाणी पाजताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांच्या मदतीने आरोपी पोलीस व्हॅनच्या दिशेने चालतानाही दिसत आहे. मात्र रुग्णालयात जात असतानाच रस्त्यात आरोपीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३७६ (बलात्कार) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जमाविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आधार कार्डच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:24 pm

Web Title: minor girl rape accuse beaten to death by people in jalandhar
Next Stories
1 Google Down : अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात ‘गुगल डाऊन’
2 Online Scam : माजी सरन्यायाधीशांनाच एक लाखाचा गंडा
3 अमरनाथ यात्रेसाठी एक लाख भाविकांनी केली नोंदणी
Just Now!
X