03 March 2021

News Flash

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

मेरठजवळच्या खातोली परिसरात चारजणांनी एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चालत्या गाडीतच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

| July 31, 2015 01:50 am

मेरठजवळच्या खातोली परिसरात चारजणांनी एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चालत्या गाडीतच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
सदर अल्पवयीन मुलगी आपल्या बहिणीसमवेत शाळेतून घरी परतताना चारजणांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर चालत्या गाडीतच सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित युवतीला ओळखणारी एक व्यक्ती आणि नदीम नावाच्या आरोपीने या मुलींना शाळेच्या वाटेवरच गाठले आणि त्यांना गाडीने शाळेत सोडतो असे सांगितले. लहान बहिणीला शाळेत सोडल्यानंतर या दोघांसह अन्य दोघांनी गाडी मेरठकडे वळविली आणि गाडीतच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
केला.
त्यानंतर या चौघांनी बेशुद्धावस्थेत पीडितेला खरदाऊनी परिसरातील लावाड-मसुरी रस्त्यावर फेकले. नदीमला अटक करण्यात आली असून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्य आरोपींचा
शोध सुरू आहे, असे
पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:50 am

Web Title: minor girl rape brutally
Next Stories
1 पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात जवान शहीद
2 तालिबानने अफगाण सरकारशी चर्चेचे वृत्त फेटाळले
3 हल्ल्यामागे पाकिस्तानच ; गुरुदासपूरबाबत राजनाथ सिंह यांचे निवेदन
Just Now!
X