27 February 2021

News Flash

बालवर्गातील दोन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

(संग्रहित छायाचित्र)

‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा

कोलकात्याच्या डायमंड हार्बर परिसरातील बालवर्गाच्या आवारामध्ये दोन वर्षांच्या चिमुरडय़ावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पीडित मुलगा २ जून रोजी घरी आला तेव्हा त्याच्या गुप्तांगामधून रक्त वाहत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलाची आई त्याला शाळेतून घरी आणण्यासाठी गेली तेव्हा तो जोरात रडत असल्याचे दिसले, घरी पोहोचल्यावर आईने मुलास बाथरूममध्ये नेले तेव्हा त्या मुलाच्या गुप्तांगामधून रक्त वाहत असल्याचे दिसले. त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आले, मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. शाळेतील सीसीटीव्ही बंद पडले असून शाळेने कोणतेही फुटेज दाखविण्यास नकार दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला.

परिचारिकेला अटक

मंदसौरमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या अल्पवयीन पीडितेचे भ्रमणध्वनीवर छायाचित्र काढून तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी येथील महाराजा यशवंतराव या सरकारी रुग्णालयातील एका ज्येष्ठ परिचारिकेला अटक केली आहे. तिचे नाव रमा कुशवाह असे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 12:53 am

Web Title: minor girl raped 2
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला
2 पकोडे नंतर आता लोणचं विकण्याचा केंद्रीय मंत्र्याचा सल्ला
3 राहुल गांधी कोकेनचे सेवन करतात, त्यांची डोप टेस्ट करा: सुब्रमण्यम स्वामी
Just Now!
X