भोपाळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिन्ही आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होते. पबजी हा ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळताना आरोपींनी पीडित मुलीबरोबर मैत्री केली होती. तिन्ही आरोपी, पीडित मुलीला तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होते. या तिघांना आता अटक करण्यात आली आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
ऑनलाइन पबजी खेळताना त्या तिघांची अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री झाली होती असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. बलात्काराची घटना सप्टेंबर महिन्यात घडली. पीडित मुलीचा त्यांनी विश्वास संपादन केला व तिला रंभा नगर येथे बोलवून घेतले. तिथे त्यांनी पीडित मुलीवर बलात्कार केला व या कृत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ सुद्धा बनवला.
त्यानंतर त्यांनी मुलीला व्हिडीओ ऑनलाइन अपलोड करायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओच्या आधारे त्यांनी मुलीवर पुन्हा बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. मुलीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिघांना बुधवारी रात्री अटक केली. बलात्कारासह विविध कलमांतर्गत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 4:31 pm