News Flash

धक्कादायक! अल्पवयीन बलात्कार पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर शौचालयात केलं फ्लश; अन् त्यानंतर…

ही मुलगी बलात्कारामुळे सहा महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

एका अल्पवयीन मुलीने रुग्णालयातील शौचालयात प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला आणि त्या अर्भकाला फ्लश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कोचीमधील एका खासगी रुग्णालयात ही घटना बुधवारी उघडकीस आली. ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तिथल्या शौचालयात तिने बाळाला जन्म दिला आणि अर्भकाला शौचालयात फ्लश करून बाहेर येऊन गेली. बाहेर आल्यानंतर तिने या प्रकरणाबद्दल कोणालाही सांगितले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

त्या मुलीनंतर शौचालयात गेलेल्या व्यक्तीला तिथे अर्भकाचे अवशेष दिसले आणि तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तपासात त्या अल्पवयीन मुलीनेच बाळाला जन्म देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलीस चौकशीत मुलीने या प्रकरणाची कबुली दिली आणि एका २० वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार करून गर्भवती केल्याचं तिने सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने ती गर्भवती असण्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते आणि ती सहा महिन्यांची गर्भवती होती. झालेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलीच्या आईने तक्रार दिली. त्याआधारे वायनाडमधील एका व्यक्तीविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीला गुरुवारी अटक करून कोची येथे आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 11:13 am

Web Title: minor rape victim gives birth in hospital toilet flushes down foetus in kochi kerla hrc 97
Next Stories
1 Corona Update: देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण; रिकव्हरी रेट ९७.४३ टक्क्यांवर
2 पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा; बायडेन यांच्यासोबत होणार चीन-अफगाणिस्तानवर चर्चा
3 ..म्हणून गुगलने माजी अफगाणी सरकारची खाती केली बंद
Just Now!
X