News Flash

धक्कादायक! शाळेतच विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडीओ शूट करुन केला व्हायरल

शाळेत्या इमारतीच पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबाला मिळाली माहिती

१० वर्षाच्या मुलीवर आठ अल्वपयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

शाळेच्या इमारतीतच दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुख्य आरोपीसह आठ अल्वपयीन मुलांचा समावेश आहे. इतकंच नाही तर हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करुन व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्यात आला. हरियाणामध्ये हा प्रकार घडला आहे.

आरोपींनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन आठवड्यांनी कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाली अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली. नऊपैकी पाच आरोपी हे पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी रेवारी जिल्ह्यातील गावात ही धक्कादायक घटना घडली. पाचवीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं. कुटुंबाने व्हिडीओ पाहिल्यानंतर ९ जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपींनी मुलीला शाळेतील रिकाम्या इमारतीत नेलं आणि बलात्कार केला. १८ वर्षीय मुलाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींनी तो फॉरवर्ड करुन व्हायरल केला”. आरोपींमधील पाच जण १० ते १२ वयोगटातील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:01 pm

Web Title: minor student gangraped in haryana school sgy 87
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बसणार मोठा झटका!; मुकुल रॉय ‘टीएमसी’त प्रवेश करणार?
2 खाणीमध्ये पाच कामगार ११ दिवसांपासून अडकल्याची भीती, नौदलाकडे मागितली मदत
3 उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग! ; पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
Just Now!
X