News Flash

पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्य निर्वासितांना भारतात वास्तव्याची मुभा

अल्पसंख्य समाजातील निर्वासितांना मानवतेच्या दृष्टिकोनातून देशात वास्तव्य करण्याची मुभा देण्यात आली आहे

| December 9, 2015 01:37 am

अल्पसंख्य समाजातील निर्वासितांना त्यांच्याकडे वैध दस्तऐवज नसला तरीही मानवतेच्या दृष्टिकोनातून देशात वास्तव्य करण्याची मुभा देण्यात आली आहे,

लोकसभा अधिवेशन
पाकिस्तान आणि बांगलादेशातून गेल्या ३१ डिसेंबपर्यंत भारतात आलेल्या अल्पसंख्य समाजातील निर्वासितांना त्यांच्याकडे वैध दस्तऐवज नसला तरीही मानवतेच्या दृष्टिकोनातून देशात वास्तव्य करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे मंगळवारी लोकसभेत सांगण्यात आले.
या बाबत गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सभागृहात सांगितले की, ७ सप्टेंबर २०१५ रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजातील निर्वासितांना त्यांच्याकडे पारपत्रासह अन्य वैध दस्तऐवज नसला तरीही भारतात वास्तव्य करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे रिजिजू म्हणाले. बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व कायदा १९५५ अन्वये भारतीय नागरिकत्व मिळू शकते. बांगलादेशाच्या सीमेवरील भारताच्या ताब्यातील भागांत वास्तव्य करणाऱ्यांना यापूर्वीच भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहितीही गृह राज्यमंत्र्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 1:37 am

Web Title: minority refugees from pak bangladesh can stay in india without valid documents
Next Stories
1 आयसिसच्या प्रसाराविरोधात सरकारच्या उपाययोजना
2 मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदीवर ट्रम्प ठाम
3 आमिरला सोनियांची फूस ; विहिपच्या साध्वी प्राची यांचा आरोप