06 August 2020

News Flash

वॉर रुममधून अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या IAFच्या महिला अधिकाऱ्याला ‘युद्ध सेवा मेडल’

विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता

बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

मी २६ आणि २७ फेब्रुवारीच्या दोन्ही मिशनमध्ये सहभागी झाले होते. विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता असे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीच्या सकाळी एकूण सात फाईटर कंट्रोलर डयुटीवर तैनात होते. मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.

आकाशात नेमकी काय स्थिती आहे. पाकिस्तानी फायटर विमान कुठे, कुठल्या दिशेला आहेत त्याची माहिती त्या भारतीय वैमानिकांना देत होत्या. मिंटी अग्रवाल यांनीच विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना माघारी फिरण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम जॅम करण्याची यंत्रणा असल्यामुळे अभिनंदन यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचलाच नाही. अभिनंदन यांचे विमान आकाशात झेपावल्यानंतर काय चित्र आहे याची मी त्यांना कल्पना दिली होती असे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 4:13 pm

Web Title: minty agarwal who guided abhinandan during february 27 dogfight gets yudh seva medal dmp 82
Next Stories
1 पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी मदत करा; बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांची भारताला हाक
2 Independence day: पाकिस्तानी नेटकऱ्यांना अदनान सामीने दिली सडेतोड उत्तरं, म्हणाला…
3 पंतप्रधान मोदींनी ९२ मिनिटांच्या भाषणात एकदाही नाही केला पाकिस्तानचा उल्लेख
Just Now!
X