News Flash

औषधांविना उपचारांचा दावा करणाऱ्या सॅबेस्टिअन मार्टिन यांचा मृत्यू

मूत्रपिंडाच्या विकारामुळे मार्टिन यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

हिलिंग प्रक्रियेच्या साह्याने लोकांना बरे करण्याचा दावा मार्टिन करत होते.

कोणत्याही औषधांविना रुग्णांचा आजार बरा करण्याचा दावा करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांचा बुधवारी मृत्यू झाला. मार्टिन यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यामध्ये ते कोणत्याही औषधांशिवाय किंवा उपचारांशिवाय वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांना बरे केल्याचा दावा करीत असत. मात्र, यामुळे त्यांच्यावर भोंदूगिरीचाही आरोप करण्यात येत होता. याचवर्षी फेब्रुवारीमध्ये ते स्वतःवरील उपचारांसाठी एका रुग्णालयात गेल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली होती. त्याचबरोबर त्यांच्या उपचारपद्धतीबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली होती. अल्सर आणि मूत्रपिंडाच्या विकारामुळे मार्टिन यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
हिलिंग प्रक्रियेच्या साह्याने लोकांना बरे करण्याचा दावा मार्टिन करत होते. उपचारांवेळी तो जोरजोरात ओरडत असल्याचेही व्हिडिओंमध्ये दिसत होते. मार्टिन हिप्नोटाईज करून उपचार करतो, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात येत होते. मार्टिन यांच्या प्रार्थना सभेमध्ये जाऊनही आपल्याला कोणताही फायदा झाला नाही. आपला आजार बरा झालाच नाही, असे त्यांच्याकडून उपचार घेतलेल्या रुग्णांनी सांगितले होते. त्यानंतर मार्टिन यांच्यावर विविध स्तरातून टीका होऊ लागली होती. बनावट पद्धतीने मार्टिन उपचार करीत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येऊ लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:00 pm

Web Title: miracle healer and christian pastor sebastian martin passes away in vasai
Next Stories
1 डाळीपेक्षा फोडणी महाग!
2 गणेश मंडळांपुढे पालिकेचे नमते!
3 ठाणेकरांच्या तहानभुकेला पालिकेचे खानपान!
Just Now!
X