नवी दिल्ली : केंद्र सरकार आर्थिक पॅकेजच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करीत असून, सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजना सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ १.६ टक्के म्हणजे ३.२२ लाख कोटी रुपये इतक्याच असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला.

गरीब आणि लघू व मध्यम उद्योगांच्या हाती पैसे देणे गरजेचे असून त्यासारख्या उपाययोजना मोदी यांनी जाहीर कराव्यात, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी, या पॅकेजवर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना दिले. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज केवळ ३.२२ लाख कोटी रुपये म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.६ टक्के इतकेच आहे, २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज नाही. अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे आणि कर्ज देणे यामध्ये फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.