आमच्या लष्करी दलांनी आणखी दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आज उडवली, असा दावा इराणने केला आहे. उत्तर कोरियाप्रमाणेच इराणनेही अमेरिकेला न जुमानता दोन दिवस आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा धडाका चालवला आहे. इराणने अणुकार्यक्रम माघारी घेतल्याने त्या देशावरचे अणुर्निबध उठवताना आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांच्यावर वेगळे र्निबध आधीच लादण्यात आले आहेत. रेव्होल्यूशनरी गार्ड्सचे जनरल होसेन सलामी यांनी सांगितले की, लांब पल्ल्याचे ‘कद्र एच’ व ‘कद्र एफ’ ही क्षेपणास्त्रे आज सोडण्यात आली. त्यांनी १४०० किलोमीटर म्हणजे ८७० किलोमीटर अंतरावरील लक्ष्ये भेदली. सरकारी दूरचित्रवाणीने म्हटले आहे, की दोन क्षेपणास्त्रे सोडण्यात आली आहेत. उत्तरेकडील अलबोर्झ डोंगररांगाच्या भागातून त्यांचे प्रक्षेपण झाले. त्याचे व्हिडीओ चित्रण दाखवण्यात आले. इराणने मंगळवारीही अशाच चाचण्या करताना अमेरिकेला आव्हान दिले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन किरबी यांनी सांगितले की, इराणने क्षेपणास्त्र चाचण्या केल्याची खातरजमा झालेली नाही, पण तसे केले असेल तर एकतर्फी किंवा आंतरराष्ट्रीय अशा दोन पद्धतीने त्या देशावर कारवाई होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 1:46 am