06 August 2020

News Flash

भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन

भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,

 

भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियामध्ये करण्यात आलेल्या याबाबतच्या कराराविरुद्ध अमेरिकेने इशारा दिला आहे.

भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० ही ट्रम्फ क्षेपणास्त्रे संपादित करण्याची इच्छा असल्याचे भारताने २०१५ मध्येच जाहीर केले होते. पुतिन गेल्या वर्षी भारतात आले होते तेव्हा त्याबाबतचा ५.४३ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता. एस-४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा योजनेनुसारच केला जाईल, असे पुतिन यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या वेळी द्विपक्षीय चर्चा झाली.

रशियासमवेतच्या एस-४०० कराराला अमेरिकेने विरोध दर्शविला असून रशियाकडून शस्त्रे आणि लष्करी सामग्री घेणाऱ्या देशांवर र्निबध घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 2:44 am

Web Title: missile to india in a scheduled time akp 94
Next Stories
1 बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक
2 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक?
3 प्रदूषणाबाबत चार राज्यांच्या सचिवांना समन्स
Just Now!
X