नौदलाच्या एका जहाजाला पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कोस्टगार्ड डॉर्निअर विमानाचे सिग्नल मिळाले आहेत. आज सकाळी पुदुच्चेरीच्या दक्षिणेला पोर्तो नोवो आणि कराईकलच्या मधील परिसरातून विमानाचे हे सिग्नल येत आहेत. या विमानात
आयएनएस संध्यक या सर्वेक्षण जहाजाला हे सिग्नल पॉंडिचेरीच्या दक्षिण भागातील पोर्ट नोवो आणि कराईकलमध्ये मिळाले आहेत. याच ठिकाणच्या जवळपास हे एयरक्राफ्ट बेपत्ता झाले होते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या महिनीनुसार आयएनएसला ३७.५ केएचझेड तीव्रतेचे सिग्नल थांबून-थांबून  मिळत आहेत. तसेच, त्या परिसरात तेल पसरल्याचेही आढळून आलेय. त्यामुळे बेपत्ता डॉर्निअर विमान आणि त्यातील तिघांच्या शोधाला वेग आला आहे
चेन्नईहून उड्डाण घेतलेल्या तटरक्षक दलाच्या या डॉर्निअर विमानात तिघे जण होते. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हे विमान बेपत्ता झाले होते.