मलेशियातील क्वालालंपूर येथून बीजिंगकडे ८ मार्च रोजी निघालेले विमान उड्डाणानंतर  बेपत्ता झाले असून त्याचा सांगाडा अजून सापडलेला नाही. एमएच ३७० विमानाच्या संदर्भात काही माहिती असलेल्या जागल्यांनी माहिती दिल्यास त्याला ५० लाख अमेरिकी डॉलरचे इनाम दिले जाईल अशी घोषणा या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
मलेशियन अधिकाऱ्यांनी या विमान अपघाताच्या चौकशीत बनवाबनवी केली आहे त्यामुळे किमान पैशाच्या आमिषाने तरी कुणीतरी आतल्या गोटातील व्यक्ती खरी माहिती देईल, अशी या नातेवाईकांना आशा आहे. रिवॉर्ड- एमएच ३७० या मोहिमेत ५० लाख अमेरिकी डॉलर देण्यात येणार असून जो जागल्या ही माहिती देईल त्याला हे इनाम मिळेल. इनडायगोगो या संकेतस्थळावर या इनामाच्या रकमेसाठी पैसा गोळा करण्यात येत असून मलेशिया एअरलाईन्सचे बोईंग ७७७-२०० जेट विमान ८ मार्चला क्वालालंपूर येथून बीजिंगला जाताना बेपत्ता झाले होते. हे विमान दक्षिण हिंदी महासागरात कोसळल्याचा अंदाज नंतर व्यक्त करण्यात आला पण प्रगत शोध घेऊनही त्याचा सांगाडा सापडला नव्हता.
आमिषाने कोणीतरी पुढे येईल
इनाम मोहिमेचे प्रमुख असलेले एथन हंट यांनी सांगितले की, कुणालातरी या विमानाविषयी काहीतरी माहिती असली पाहिजे, कदाचित पैशाच्या आमिषाने तो किंवा ती ही माहिती पुढे येऊन सांगेल. सारा बँजेक हिचा जोडीदार फिलीप वूड या विमानात होता,