मिसिसिपी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांना विषारी द्रव्य लावलेले धमकी पत्र पाठवल्याच्या आरोपाची कबुली दिली आहे. जेम्स डयुश्के या आरोपीने  बराक ओबामा, सिनेटर रॉजर विकर व मिसिसिपीच्या न्यायाधीशांना रिसीन हा विषारी पदार्थ लावलेले पत्र पाठवले होते. डय़ुश्केला आता अभियोक्तयांशी झालेल्या कबुलीपत्राच्या करारानुसार २५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्याच सारख्या दुसऱ्या व्यक्तीला पकडले होते पण नंतर डय़ुश्के हाच खरा गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्यात आले. डय़ुश्के याला ३०० महिने तुरुंगात काढावे लागतील असे न्याय विभागाने म्हटले आहे. त्याने आरोप मान्य केल्यानंतर आता त्याला येत्या साठ दिवसांनी शिक्षा सुनावली जाईल.