News Flash

आता ‘या’ दोन राज्यात कडक लॉकडाऊन

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्णय

करोनाचे वाढते रुग्ण आणि होणारा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान देश आणि राज्यांपुढे आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे राज्यांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे. आता मिझोरम आणि तामिळनाडु या दोन राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिझोरमने ७ दिवसांचा तर तामिळनाडुने १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

मिझोरममध्ये १० मे पासून सकाळी ४ ते १७ मे पर्यंत सकाळी ४ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. यावेळी राज्यसीमा खुल्या असणार आहेत. राज्यात येणाऱ्या प्रवाशांना सीमेवर करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर १० दिवस आयसोलेशनमध्ये राहणं बंधनकारक असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मॉल्स आणि दुकानं बंद असणार आहेत.

Corona : पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, म्हणाले…!

तामिळनाडुतही १० मे पासून २४ मे पर्यंत १४ दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकानं, भाज्या, मास आणि मासे विक्री करणारी दुकानांना सूट देण्यात आली आहे. शनिवार रविवार सर्व दुकानं सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरु राहील. मात्र दारूची दुकानं पूर्णपणे बंद असतील असं आदेशात सांगण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेत असण्याऱ्यांना यात सूट देण्यात आली आहे.

देशात करोनाचा रौद्रावतार ! २४ तासांत चार हजारांहून जास्त मृत्यू, आत्तापर्यंतचा उच्चांक!

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडव सुरु आहे. देशाच्या विविध भागात करोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाची झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या २४ तासांत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 2:00 pm

Web Title: mizoram and tamil nadu states impose lockdown to prevent the spread of corona rmt 84
Next Stories
1 Corona : पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन, म्हणाले…!
2 आनिवासी भारतीय नव्हे, आता अनिवासी तामिळ विभाग! सत्तेत येताच द्रमुकनं बदलली ९ मंत्रालयांची नावं!
3 ‘नागरिकांचा जीव जातोय…’; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Just Now!
X