मिझोराममधील काँग्रेसचे पाच वेळचे मुख्यमंत्री लालथनवाला यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लालथनवाला यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती.  चाम्पाई आणि सरचीप या दोन्ही जागांवर लालथनवाला यांचा पराभव झाला आहे.  त्यांचा मिझो नॅशनल या पक्षाच्या (Mizo National Front) टीजे ललनुंतलुआंगा यांनी पराभव केला.

काँग्रेसने गेल्या निवडणुकीत ४० पैकी ३२ जागा जिंकून मिझो नॅशनल या पक्षाचे वर्चस्वच मोडीत काढले. चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेसचे लालथनवाला पाचव्यांदा मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मिझोराममध्ये ४० जागांसाठी १४२ उमेदवार रिंगणात आहेत; तर मतदारांची संख्या ६,९०,८६० आहे. मुख्यमंत्री लालथनवाला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यापैकी एका जागेवर त्यांना पराभवाचा झटका बसला आहे.

मिझोराममध्ये आता आलेल्या निकालानुसार मिझो नॅशनल या पक्षाने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मिझो नॅशनल पक्षाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्ष फक्त सहा जागांवर आघाडीवर आहे. भाजपा एक आणि अन्य चार जागांवर आघाडीवर आहेत.