मिझोराममध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. ८ नोव्हेंबपर्यंत अर्ज दाखल करता येतील.
सत्ताधारी काँग्रेसने ४० पैकी ३१ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. मुख्यमंत्री लाल थनहावला दोन ठिकाणांहून निवडणूक लढवणार आहेत. विरोधकांनी मिझोराम लोकशाही आघाडी स्थापन केली असून त्यांनी १२ उमेदवारांची घोषणा केली आहे.भाजपने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.