आरक्षण धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्या धसास लावण्यासाठी ओदिशातील अनुसूचित जाती-जमातीच्या (एससी-एसटी) सर्वपक्षीय आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचा प्रश्न बुधवारी राज्य विधानसभेत उपस्थित करण्यात आला.
सभागृहात शून्य प्रहराला काँग्रेसचे सदस्य प्रफुल्ल मांझी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. अनुसूचित जाती-जमाती विकासमंत्र्यांनी या बाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही या वेळी त्यांनी केली. सर्वपक्षीय आमदार या वेळी एकत्रित आल्याने आम्ही आंदोलन अधिकाधिक तीव्र करणार असल्याचे दिले. दलित आणि आदिवासींना घटनेने दिलेले अधिकारी सरकार नाकारत असल्याचा आरोप भाजपचे रविनारायण नाईक यांनी केला.