26 November 2020

News Flash

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंग, मंदिराजवळ मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

राजस्थानमध्ये जमावाकडून मारहाण करत हत्या करण्यात आल्याची अजून एक घटना समोर आली आहे

राजस्थानमध्ये जमावाकडून मारहाण करत हत्या करण्यात आल्याची अजून एक घटना समोर आली आहे. मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाला. राजस्थानमधील चितौडगडमध्ये ही घटना घडली आहे. पीडित तरुण आपल्या मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी मंदिराजवळील नदीकिनारी आला होता. मात्र गावकऱ्यांनी मासेमारी करण्यावरुन त्याला बेदम मारहाण केली.

हे प्रकरण १७ सप्टेंबरचं आहे. २२ सप्टेंबरला उदयपूरच्या सरकारी रुग्णालयात तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरला अजहर खान आपले तीन मित्र शाहनवाज खान (23), नौशाद खान (47) आणि अन्वर खान (41) यांच्यासोबत रुपारेल नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला होता. तिथे उपस्थित लोकांची त्यांच्यावर नजर होती. मासे मारण्यासाठी त्यांना जाळं टाकताच मंदिर अपवित्र करत असल्याचा आरोप करत काहीजणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी बाकी तिघेजण पळून गेले, मात्र अजहर खान तोल गेल्याने तिथेच अडखळला. गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. पळून गेलेल्या तरुणांना अजहरच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अजहर जखमी अवस्थेत पडला होता. त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अजहर याचा मृतदेह गावी पोहोचल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात आधीपासून दोन गटात तणाव होता. काहीजणांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 8:04 am

Web Title: mob lynching in rajasthan muslim youth beaten to death for fishing
Next Stories
1 सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला आज ब्रेक
2 भारताच्या मंगळयानास चार वर्षे पूर्ण
3 इम्रान यांच्या भारताशी चर्चेच्या प्रस्तावावर विरोधकांची टीका
Just Now!
X