News Flash

Mob lynching : मारहाणीच्या घटनांसाठी आता सोशल मीडियाचे उच्चाधिकाऱीही ठरणार जबाबदार?

मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील सचिवांच्या समितीने केलेल्या प्रमुख शिफारशींवर चर्चा झाली.

Mob lynching : मारहाणीच्या घटनांसाठी आता सोशल मीडियाचे उच्चाधिकाऱीही ठरणार जबाबदार?
प्रातिनिधीक छायाचित्र

देशात जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्यास त्याला आता फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या उच्चाधिकाऱ्यांनाही उत्तर द्यावे लागू शकते, अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ही शिफारस केली आहे. त्याचबरोबर अशा घटनांसंबंधी गुन्हा निश्चितीसाठी भारतीय दंड विधानात नवी तरतूद करुन कायदा अधिक कडक करण्याबाबतही शिफारस या समितीने केली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मंत्रीगटाची बैठक पार पडली. यात केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील सचिवांच्या समितीने केलेल्या प्रमुख शिफारशींवर चर्चा झाली. या शिफारशींपैकी एक म्हणजे भारतात सोशल मीडियाचे प्रमुख अधिकाऱीही याला जबाबदार असतील. या शिफारशींना अंतिम स्वरुप देण्यासाठी आगामी काळात या मंत्रीगटाच्या अनेक बैठका होऊ शकतात. त्यानंतर शेवटी या शिफारशी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात येतील. गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रीगटामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, परिवहन मंत्री नितीन गडकरी, विधी मंत्री रविशंकर प्रसाद आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात देशात नऊ राज्यांमध्ये जमावाकडून ४० मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात जुलै महिन्यांत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला यावर कायदेशीर तरतूदी करण्याचे निर्देश दिले होते.

अशा घटना प्रामुख्याने व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांमुळेच घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुले पळवून नेणारी टोळी, प्राण्यांची तस्करी करणारी टोळी अशा आशयाचे मेसेज व्हायरल होत होते. या अफवांना बळी पडत जमावाकडून अनेकांना मारहाण करीत ठार करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 7:51 pm

Web Title: mob lynching will now be responsible for social media officials
Next Stories
1 समलैंगिक संबंध कायदेशीर की बेकायदेशीर? आज निकाल
2 राफेल डीलवर टीका करणाऱ्यांनी यातील नियम व खरेदी प्रक्रिया समजून घ्यावी : एअर मार्शल देव
3 FB बुलेटीन: उद्धव ठाकरेंची राम कदमांवर टीका, संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल व अन्य बातम्या
Just Now!
X