News Flash

अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी चोरांचा सुळसुळाट, बाबूल सुप्रियोंसहित ११ जणांचे मोबाइल चोरीला

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत काही चोरांनी हात साफ केले. जवळपास ११ जणांचे मोबाइल फोन चोरी करण्यात आले. यामध्ये भाजपा खासदार बाबूल सुप्रियो आणि पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजारावाल यांचाही समावेश आहे.

एस के तिजारावाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोबाइल चोरीला गेल्याची माहिती दिली. आपल्यासोबत १० जणांचे मोबाइल चोरीला गेले असल्याची तक्रार त्यांनी या माध्यमातून केली. भाजपा खासदार सुप्रिया सुळे यांचाही मोबाइल चोरीला गेलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एस के तिजारावाल यांनी ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.

“अरुण जेटली यांना आम्ही श्रद्धांजली वाहत असताना हो फोटो ज्या मोबाइलमधून घेतला त्यानेही माझा निरोप घेतला. अंत्यसंस्काराच्या ठिकाणीही संधी साधून चोरी केली जाते ही फार खेदाची बाब आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. एस के तिजारावाल यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले असून आपल्या मोबाइल फोनचं लोकेशन शेअर केलं आहे.

बाबूल सुप्रियो यांनी ट्विट करत ३५ जणांचे मोबाइल चोरीला गेले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान पोलिसांनी आपल्याकडे पाच तक्रारी आल्या असून यामध्ये खासदार बाबूल सुप्रियो यांचाही समावेश असल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:36 pm

Web Title: mobile phone theft mp babul supriyo bjp leader arun jaitley funeral sgy 87
Next Stories
1 ३० वर्षांपासून ‘तो’ एकाचवेळी करत होता तीन सरकारी नोकऱ्या, असा झाला भांडाफोड
2 आर्थिक मंदीच्या झळा; मारुती सुझुकीने केली ३००० कंत्राटी कामगारांची कपात
3 “आरबीआयकडून चोरी करुन काही फायदा होणार नाही”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
Just Now!
X