05 March 2021

News Flash

एक एप्रिलपासून मोबाइल युझर्सला कॉल आणि इंटरनेटसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

टेलीकॉम कंपन्यांना लॉकडाउनच्या काळात इंटरनेट वापर वाढल्याने नफा झाला असतानाही...

फाइल फोटो

देशभरातील टेलीकॉम कंपन्यांनी येणाऱ्या महिन्यांमध्ये दरवाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या दरवाढीचा थेट फटका मोबाइल वापरणाऱ्यांना बसणार असून फोन कॉल तसेच इंटरनेटचेही दर यामुळे वाढणार आहेत. टेलीकॉम कंपन्या एक एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून दरवाढ करण्याच्या विचारात आहेत. इनव्हेस्टमेंट इनफॉर्मेशन अ‍ॅण्ड क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या (आयसीआरए) अहवालानुसार एक प्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच २०२१-२२ मध्ये आपला नफा वाढवण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही दरवाढ नक्की किती असेल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

आयसीआरएच्या अहवालानुसार दरवाढ केल्याने आणि ग्राहकांना टू जी वरुन फोर जी सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त केल्याने दर वापरकर्त्यामागील सरासरी नफा वाढण्याची कंपन्यांना अपेक्षा आहे. अर्थ्या वर्षात हा नफा जवळजवळ २२० कोटींपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पुढील दोन वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा नफा ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑप्रेटिंग मार्जिनचा नफा ३८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

करोना लॉकडाउन आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या वातारवणामध्येही टेलिकॉम क्षेत्राला विशेष फटका बसला नाही. उलट लॉकडाउनच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्याने कंपन्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, व्हिडीओ कॉल्स यामुळे इंटरनेटचा वापर वाढल्याने लॉकडाउनमध्येही कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली.

टेलिकॉम कंपन्या एकूण अ‍ॅडजेस्टेड ग्रास रेव्हेन्यू म्हणजेच एजीआर म्हणून १.६९ लाख कोटी देणं लागतात. आतापर्यंत यापैकी केवळ ३० हजार २५४ कोटी रुपये १५ टेलिकॉम कंपन्यांनी दिले आहेत. एअरटेल २५ हजार ९७६ कोटी, व्होडाफोन आयडीया ५० हजार ३९९ कोटी आणि टाटा टेलीसर्विसेज १६ हजार हजार ७९८ रुपये देणं लागतात. कंपन्यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा दरवाढ केली होती. टेलिकॉम कंपन्यांनी २०१९ च्या शेवटच्या महिन्यात दरवाढ केलेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:40 pm

Web Title: mobile telecom tariff hikes from 1st april 2021 scsg 91
Next Stories
1 युरोपीय संघाचे प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल
2 महिला न्यायाधीशाबरोबर ‘फ्लर्ट’ करणाऱ्या माजी न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
3 शाळा सुरू होताच १५ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह; पुन्हा शाळा बंद!
Just Now!
X