01 October 2020

News Flash

हुतात्मा अफगाण सैनिकांच्या पाचशे मुलांना शिष्यवृत्ती

मोदी यांनी आज अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी व इतर नेत्यांची भेट घेतली, तसेच द्विपक्षीय संबंध तसेच सुरक्षा प्रश्नांवर चर्चा केली.

| December 26, 2015 12:02 am

पंतप्रधानांची घोषणा
अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलातील हुतात्मा झालेल्या जवानांच्या पाचशे मुलांसाठी शिष्यवृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या. मोदी यांनी आज अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी व इतर नेत्यांची भेट घेतली, तसेच द्विपक्षीय संबंध तसेच सुरक्षा प्रश्नांवर चर्चा केली. मॉस्को येथून त्यांचे आज पहाटे अफगाणिस्तानात आगमन झाले. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महंमद हनीफ अटमार व उपपरराष्ट्रमंत्री हिकमत करजाई यांनी त्यांचे स्वागत केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले, की ट्विटनुसार पंतप्रधानांनी अफगाणिस्तानला दोस्त असे संबोधले आहे. मोदी यांचे अध्यक्षीय प्रासादात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी सहकार्याच्या व इतर मुद्दय़ांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सुरक्षास्थितीचा आढावा घेतला. अफगाणिस्तानात तालिबानचे पुनरुज्जीवन होण्याची भीती असताना मोदी व घनी यांच्यात झालेल्या चर्चेला महत्त्व आहे. मोदी यांचे तेथील संसदेतही भाषण झाले. त्या वेळी त्यांनी अफगाणी सुरक्षा दलातील हुतात्मा जवानांच्या ५०० मुलांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. दरवर्षी एक हजार अफगाणी मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजनाही चालूच राहणार आहे. सलमा धरणातून पुन्हा पाणी वाहू लागेल. स्टोर पॅलेस पुन्हा वारशाचे प्रतीक म्हणून उभा राहील असे सांगून त्यांनी भारतीय राजनीतिज्ञ, अधिकारी, अभियंते, डॉक्टर्स यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 12:02 am

Web Title: modi announces 500 scholarships for the children of martyred afghan troops
टॅग Narendra Modi
Next Stories
1 पोलीस-निदर्शकांत काश्मिरात चकमकी
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात येण्यासाठी रवाना
3 पंतप्रधान ऑन ड्युटी २४ तास, मोदींची १९ महिन्यांत एकही सुटी नाही!
Just Now!
X