News Flash

‘एके ४७’, ए.के अँटनी आणि ‘एके ४९’ हे तीन एक्के पाकिस्तानच्या जवळचे- मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी उधमपूरमधील हिरानगर मतदार संघातून आपल्या 'भारत विजय सभां'ना सुरूवात केली. घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे असल्याचे म्हणत मोदींनी

| March 26, 2014 12:40 pm

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी उधमपूरमधील हिरानगर मतदार संघातून आपल्या ‘भारत विजय सभां’ना सुरूवात केली.  घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
देशात सेक्यूलरपणाच्या नावाखाली युवकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही मोदींनी केला. यूपीए सरकारच्या काळात देशातील जवानांचे शिरच्छेद केले जात आहेत, रोजगाराच्या समस्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावाने ठणठण गोपाळ राजकारण सुरू आहे मग, अशा घराणेशाहीला निवडून देऊन तुम्ही काय साधणार? असा सवालही मोदींनी जनतेसमोर उपस्थित केला.
देशातील समस्या सोडवू शकत नाही असे सरकार हवे तरी कशाला? काँग्रेसला या निवडणूकीत त्यांची जागा दाखवून द्या असेही मोदी म्हणाले.

देशाला तीन ‘एक्क्यां’चा धोका-
मोदी म्हणतात, देशाला सध्या तीन एक्क्यांचा धोका आहे. पहिला आहे ‘एके-४७’: या बंदुकीतून देशाच्या जवानांची पाकिस्तानकडून हत्या केली जात आहे.
दुसरा आहे ए.के.अँटनी– भारताचे संरक्षण मंत्री कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरले. भारतीय सैनिकांवरील हल्ल्यानंतर ए.के.अँटनींनी केलेली वक्तव्ये भारतालाच त्यांच्यापासून धोका असल्यासारखी वाटणारी आहेत.
तिसरा आहे ‘एके-४९’: देशात सध्या नवीन एके-४९ पक्ष (आम आदमी) जन्माला आला आहे की जो, देशालाच दुभागण्याचे काम करत आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर चक्क पाकिस्तानात असल्याचे दाखविण्यात आले आहे, मग असे पक्ष देश कसा सांभाळणार? असा सवालही मोदींनी उपस्थित केला. 
त्यामुळे पाकिस्तानला भारतावर कुरघोडी करण्यासाठी ‘एके ४७’, ए.के अँटनी आणि ‘एके ४९’ म्हणजे केजरीवाल हे तिन्ही ‘ए.के’ मिळाले असल्याचे मोदी म्हणाले.

राहुल गांधींवर हल्लाबोल-
काँग्रेसचे युवराज म्हणतात की, काँग्रेस पक्ष एक ‘सोच’ आहे , पण मी म्हणतो की आता काँग्रेसलाच विचार करण्याची वेळ आली आहे. देशाला आता असे विचार नकोत. विकास, सुरक्षा, स्वास्थ यांची हमी देशवासीयांना हवी आहे. असेही मोदी म्हणाले. आता जनतेकडे तुमचे विचार सहन करण्याची क्षमता राहिलेली नाही त्यांना विश्वासू बदल हवा आहे. असेही ते पुढे म्हणाले. लालबदादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान, जय किसाना नारा दिला होती. परंतु, हा नारा आता बदलून ‘मर जवान, मर किसान’ नितीचा अवलंब केला असल्याचीही टीका मोदींनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2014 12:40 pm

Web Title: modi attacks dynasty politics says congress not concerned about employment
Next Stories
1 भारताची लांब पल्ल्याच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी
2 सुषमा स्वराज यांच्या प्रचारातून नरेंद्र मोदी गायब!
3 मद्यसेवन आणि हुंडा घेण्यास पंचायतीचा मज्जाव
Just Now!
X