News Flash

करोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीचे मोदी यांचे जागतिक नेत्यांना आवाहन

आर्थिक संकटातून मुक्तता, नोकऱ्या आणि व्यापारापुरतीच ही मर्यादित कृती नसावी

(संग्रहित छायाचित्र)

 

जगभरात झालेला करोनाचा फैलाव हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावरील नेत्यांना निर्णायक कृती करण्याचे आवाहन केले, मात्र आर्थिक संकटातून मुक्तता, नोकऱ्या आणि व्यापारापुरतीच ही मर्यादित कृती नसावी, असेही ते म्हणाले.

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या १५ व्या जी-२० शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना ते बोलत होते.

समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचावे, कारभारातील पारदर्शकता, प्रतिभासंपन्न समूहनिर्मिती आदींचा समावेश असलेली कोविड-१९ नंतरची जागतिक सूची असावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

‘रिअलायझिंग द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ ट्वेण्टीफर्स्ट सेन्चुरी फॉर ऑल’ अशी या शिखर परिषदेची संकल्पना आहे.

कोविड-१९ मुळे आव्हान उभे ठाकलेले असतानाही २०२० मध्ये दुसरी शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल सौदी अरेबियाच्या नेत्यांचे या वेळी मोदी यांनी अभिनंदन केले. कोविडनंतरच्या जगात कोठूनही काम अशी सर्वसाआधारण स्थिती असेल, असे नमूद करून मोदी यांनी जी-२० दूरदृश्य सचिवालय स्थापन करण्याची सूचनाही या वेळी केली. या शिखर परिषदेत करोनावर मात करणे, आर्थिक संकटातून मुक्तता आणि पुन्हा रोजगार आदींवर भर देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:29 am

Web Title: modi calls on world leaders to take decisive action to control corona abn 97
Next Stories
1 ..म्हणून खासगी रुग्णालयांकडून भरमसाट शुल्कआकारणी
2 देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर
3 पाकिस्तानला पुन्हा समज
Just Now!
X