News Flash

‘गोध्रा प्रकरणी मोदींचे हात कधीच धुतले जाणार नाहीत’

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठीचे चुकीचे उमेदवार असून गोध्रा दंगलीसंदर्भात मोदींचे हात स्वच्छ नाहीत अशी टीका माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला

| November 6, 2013 04:29 am

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठीचे चुकीचे उमेदवार असून गोध्रा दंगलीसंदर्भात मोदींचे हात स्वच्छ नाहीत अशी टीका माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला यांना केला आहे.
करूणा शुक्ला यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शुक्ला म्हणाल्या, गोध्रा दंगलीच्यावेळी दंगलपीडित नागरिकांमध्ये धर्म, जात याच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ नये असे मोदी यांना वाजपेयी यांनी सांगितले होते. मात्र असे करण्यात मोदी यांना अपयश आले. त्यामुळे चांगले प्रशासन देण्यात ते अपयशी ठरले आहेत. असेही शुक्ला म्हणाल्या.   
ज्येठ भाजप नेत्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्याने राजीनामा दिल्याचे सांगत आगामी निवडणुकीमध्ये भाजपविरोधात प्रचार करणार असल्याचे शुक्‍ला यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:29 am

Web Title: modi cant wash his hands off godhra says karuna shukla
Next Stories
1 चौहान, अजयसिंह यांचे अर्ज दाखल
2 छत्तीसगडच्या सारनगड मतदारसंघात महिलांच्याच विजयाचा इतिहास
3 मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रोहनींचे निधन