मोदींचा केंद्रसरकारला सवाल
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज रविवार हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात काँग्रेस सरकारला धारेवर धरत सध्याच्या पाकिस्तान आणि चीनच्या सुरु असेलेल्या घुसखोरीला भारत सडेतोड उत्तर का देत नाही? असा सवाल उपस्थित करून सरकार मतांच्या राजकारणात गुंतले असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
पाकिस्तान लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले यावर पंतप्रधान पाकिस्तान विरोधात कोणतीही कठोर भूमिका घेत नाहीत. पंतप्रधान निष्क्रीय आहेत. मग देश प्रगती कशी करणार? असेही मोदी म्हणाले. तसेच पाकिस्तानच्या या कुरापतींविरोधात कठोर भूमिका घेण्याचीही मागणी मोदींनी भाजपच्यावतीने केली आहे.
मोदींचे टीकास्त्र:
* आंध्रचे चुकीच्या पद्धतीने विभाजन करण्यात आले. मतांचे राजकरणाकडे लक्ष देऊन विभाजन पद्धत वापरली गेली. एनडीएच्या काळातही राज्य निर्माण झाली तेही, कोणत्याही तंट्या शिवाय
* भारताची अर्थव्यवस्था डगमगली का? स्वत: पंतप्रधान अर्थतज्ज्ञ असताना रुपया घसरतो कसा? आज पंतप्रधानांचे वय तितकी(इज इक्वल टू) रुपयाची किंमत अशी स्थिती झाली आहे.
* आज सर्वात जास्त आत्महत्या आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात होत आहेत. याचे कारण तेथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
* चीनच्या घुसखोरीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री चीनच्या भेटीवर जातात आणि तेथे जाऊन कठोर भूमिका घेणे तर सोडाच, पण चक्क बिजिंग सुंदर शहर आहे. मला तर, येथे रहावेसे वाटते. असे वक्तव्य करुन भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात.