03 March 2021

News Flash

पाच राष्ट्रीय नेत्यांना मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ममता बॅनर्जींना विसरले!

५ जानेवारी हा राष्ट्रीय राजकारणातील अनेक नेत्यांचा आहे जन्मदिवस

संग्रहित छायाचित्र

५ जानेवारी हा दिवस अनेक राजकीय नेत्यांसाठी खास दिवस आहे. कारण, या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विविध राजकीय पक्षांच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस असतात. या नेत्यांपैकी काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींना शुभेच्छा पत्रं पाठवली. मात्र, ममता बॅनर्जींना मोदींनी शुभेच्छांसाठी फोन केला नाही की शुभेच्छा पत्रही पाठवलं नाही.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, डीएमकेचे नेत्या कनिमोळी, भाजपाचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते कल्याण सिंह यांचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन कल्याण सिंह यांना शुभेच्छा दिल्या तर जोशींना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना शुभेच्छा पत्र पाठवले. पंतप्रधानांनी पत्र पाठवल्याने शर्मा यांनी सुखद आश्चर्य व्यक्त केलं. मात्र, मोदींनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देण्याचा विसर पडला. जनसत्ताने याबाबत वृत्त दिलं आहे.

५ जानेवारी १९५५ रोजी कोलकाता येथे जन्म झालेल्या ममता बॅनर्जी या ६० वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी अनेक भेटवस्तू पाठवल्या आणि शुभेच्छा दिल्या. आपचे नेते अरविंद केजरीवाल, डीएमकेचे नेते एम. स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे, भाजपा नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आदी महत्वाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांचा १५ वर्षांच्या असतानाच राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी १५ व्या वर्षी जोगमाया देवी कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषद संघटनेची स्थापना केली, जी इंदिरा काँग्रेस पक्षाची स्टुडंट विंग होती. या पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनला हरवलं होतं. याद्वारे त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात एका नव्या सुर्योदयाचा आभास करुन दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 1:14 pm

Web Title: modi gives birthday wishes to five national leaders but forgot to wish mamata banerjee aau 85
Next Stories
1 ट्रम्प यांनीच हिंसा घडवून आणल्याचा घणाघात करत ओबामांचं अमेरिकन जनतेला भावनिक आवाहन, म्हणाले…
2 अमेरिकेतील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू; ५२ जणांना अटक
3 चलो दिल्ली… आज राजधानीच्या सीमांवर धडकणार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
Just Now!
X