News Flash

सरकारी बंगले रिकामे करा!; २०० हून अधिक माजी खासदारांना मोदी सरकारची नोटीस

काँग्रेस खासदाराने मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे

मोदी सरकारची नोटीस

खासदार असताना राहण्यासाठी देण्यात आलेला सरकारी बंगला खासदारकी गेल्यानंतर न सोडणाऱ्यांना मोदी सरकारने बंगले तात्काळ खाली करण्यास सांगितले आहे. आठवडाभरामध्ये घरे खाली करण्याच्या सुचना सरकारी बंगला वापरणाऱ्या माजी खासदारांना करण्यात आल्या आहेत. मात्र याच मुद्द्यावरुन कॉग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनी हा निर्णय कठोर आणि अचानक घेण्यात आल्याचे सांगत यावर टीका केली आहे.

१६ वी लोकसभा दोन महिन्यांपूर्वीच विसर्जित झाली असूनही २०० हून अधिक माजी खासदारांनी अद्यापही सरकारी बंगले सोडले नसल्याची माहिती समोर आल्यानंतर यासंदर्भात केंद्र सरकारने कारवाई केली आहे. दिल्लीतील लुटियन्स या उच्चभ्रू परिसरातील अनेक सरकारी बंगल्यांवरील ताबा अजूनही माजी खासदारांकडेच आहे. सोमवारी केंद्र सरकारने माजी खासदारांना सरकारी निवासस्थाने पुढील सात दिवसांमध्ये रिकामी करण्यास सांगितले आहे. ज्या ज्या माजी खासदारांनी अद्याप सरकारी बंगले सोडले नाहीत त्या बंगल्यांचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा थांबवण्यात येण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शर्मा यांनी ट्विटवरुन मोदी सरकारने सरकारी बंगले खाली करण्यासाठी पाठवलेल्या नोटिसींवर आक्षेप नोंदवला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी माजी खासदाराला मिळणारे निवृत्ती वेतन हे शिपायाला मिळणाऱ्या निवृत्ती वेतनापेक्षा कमी असते असं शर्मा म्हणाले आहेत. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाही निवृत्तीनंतर सहा महिने सरकारी निवास्थानात राहण्याची परवाणगी असते असंही शर्मा यांनी नमूद केलं आहे.

दुसऱ्या एक ट्विटमध्ये शर्मा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. ‘ तुम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात की व्यवसायिकांचे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे. प्रामाणिक खासदारांना त्यांच्या कुटुंबाची देखभाल करायची असते. तुम्ही ढोंगी आहात,’ असं शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नियमांनुसार खासदारकी गमावल्यानंतर एका महिन्यात सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 12:46 pm

Web Title: modi government ask over 200 former mps to vacate their official bungalows scsg 91
Next Stories
1 Chandrayan-2 : ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री यान चंद्रावर उतरणार – इस्रो
2 मोदी जगात भारी… Man vs Wild मध्ये सहभागी झाले अन् ‘हा’ विक्रम करुन आले
3 ‘चांद्रयान-२’ सात सप्टेंबरला चंद्रावर उतरणार
Just Now!
X