मोदी सरकारने फक्त राजकारणावर भर दिल्याने अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला आहे अशी टीका आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. सध्याच्या देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थला मोदी सरकार जबाबदार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारला राजकारण आणि सोशल अजेंडा राबवण्यात जास्त रस आहे. अर्थव्यवस्था प्रगती मार्गावर आणण्यात नाही अशा शब्दात रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

देशाचा विकासदर घसरल्याच्या मुद्द्यावरुनही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर टीका केली. ” लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारने राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे. ” असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.