News Flash

“मोदी सरकारने लक्षात घ्यावं लढाई करोना विरोधात आहे, काँग्रेस किंवा राजकीय विरोधकांविरुद्ध नाही”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा साधला निशाणा!

संग्रहीत

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित वाढत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. या महामारीच्या संकटात भारताच्या मदतीसाठी जगभरातून अनेक देशांनी हात पुढे केला आहे. मात्र अद्यापही देशातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोविडविरोधातील लढाई ही ‘आम्ही विरुद्ध तुम्ही’ अशी नाही, तर ती आपण विरुद्ध करोना अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढायची आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे मत व्यक्त केलं आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

“मोदी सरकारने हे लक्षात घेणं आवश्यक आही की लढाई करोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय विरोधकांविरुद्ध नाही.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच, आपल्या ट्विटसोबत त्यांनी सोनिया गांधी केलेल्या विधानाची बातमी देखील शेअर केली आहे.

करोनाविरोधातील लढा पक्षीय सीमारेषांपलीकडे : सोनिया गांधी

या अगोदर राहुल गांधी यांनी “रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकार करोनाची खरी आकडेवारी जनतेपर्यंत पोहचू देत नाही. महामारी नाही तर महामारीचं सत्य तर नियंत्रणात केलंच आहे.” अशी देखील केंद्र सरकारवर टीका केलेली आहे.

“ ‘सिस्टम’ फेल आहे…” म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा!

तसेच, “ ‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असंही राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.

शुद्ध मनानं राहुल गांधींची केंद्र सरकारकडे विनंती

याशिवाय “करोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू होऊ शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी केंद्र सरकारला उद्देशून म्हणालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:27 pm

Web Title: modi government must realise that the battle is against covid it is not against the congress rahul gandhi msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Corona: लष्कराचा वापर करणार आहात का?; सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा
2 केजरीवाल यांची मोठी घोषणा: दिल्लीत महिन्याभरात ४४ ऑक्सिजन प्लांट्स उभारणार!
3 करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द!
Just Now!
X