केंद्र सरकारने मागील एक वर्षांत देशभरातील किमान २५ शहरे आणि गावांची नावे बदलण्यास मंजुरी दिली आहे. पश्चिम बंगालचे नाव बदलण्यासाठीचा अर्ज सरकारकडे अजूनही प्रलंबित आहे. ज्या महत्वाच्या शहरांची नावे बदलण्यात आली, त्या यादीत आता अलाहाबाद आणि फैजाबादचा समावेश झाला आहे. अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालचे नामकरण बांग्ला करण्यासह अनेक शहरांचे नाव बदलण्याचे प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहेत. जागांची नावे बदलण्याची प्रक्रिया किचकट असून या निर्णय प्रक्रियेत अनेक केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचा समावेश असतो. केंद्रीय गृह मंत्रालयाने मागील एक वर्षांत देशभरातील २५ गावे आणि शहरांच्या नाव बदलण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

कोणत्या शहरांची नावे बदलली

अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला उत्तर प्रदेश सरकारकडून मिळाला होता. ज्या जागांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावास सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंदरीचे राजामहेंद्रवरम, ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हिलरला एपीजे अब्दुल कलाम आयलँड, केरळमधील मलप्पुरा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील जिंद जिल्ह्यातील पिंडारीचे पांडु-पिंडारा नामकरण करायचे आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील लांडगेवाडीला नरसिंहगाव, हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील गढी सांपलाचे सर छोटू राम नगर, राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यातील खाटू कलागावाला बडी खाटू, मध्य प्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यातील महगवां छक्का गावाचे महगवां सरकार आणि महगवां तिलियाचे महगवां घाट, उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरनगरचे शुक्रताल, खादरचे सुखतीर्थ खादर आणि शुक्रताल बांगरचे सुखतीर्थ बांगर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. तर नागालँडमध्ये दिमापूरमधील कछेरीगावाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला होता, अशी माहितीही गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

गृह मंत्रालयाकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावाच्या मंजुरी संबंधित संस्थांबरोबर चर्चा करुन त्याप्रमाणे सूचना दिली जाते. रेल्वे मंत्रालय, डाक विभाग आणि सर्व्हे ऑफ इंडियाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर जागांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. प्रस्तावित नावाचे दुसरे एखादे गाव किंवा शहर पूर्वीपासून अस्तित्वात आहे किंवा नाही हे या संस्था आपल्या नोंदीत तपासून पाहते.

एखाद्या राज्याचे नाव बदलायचे असेल तर संसदेत बहुमताने घटनेत बदल करावा लागतो. तर गावाचे किंवा शहराचे नाव बदलण्यास केवळ कार्यकारी आदेश पुरेसा असतो. पश्चिम बंगालचे नाव बांग्ला करण्याचा राज्य सरकारचा प्रस्तावावर गृह मंत्रालयाने आपले मत नोंदवून ते परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवले आहे. प्रस्तावित नाव हे शेजारील राष्ट्र बांगलादेशाशी मिळते-जुळते असल्याचे मत गृह मंत्रालयाने नोंदवले आहे.