28 September 2020

News Flash

लोकसभेपूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक, शेतकरी आणि बेरोजगारांना देणार पगार

युबीआय लागू झाल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात कोणत्याही अटीविना एक ठराविक रक्कम जमा होणार आहे

लोकसभा निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून सर्वोपतरी प्रयत्न सुरु असून शेतकरी आणि बेरोजगारांना नवीन वर्षांचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार युनिव्हर्सल बेसिक इन्कम(युबीआय) आणण्याचा विचार करत आहे. जर युबीआय लागू करण्याची परवानगी मिळाली तर 2019 लोकसभा निवडणुकीआधी देशातील नागरिकांना गुड न्यूज मिळू शकते. युबीआय लागू झाल्यास नागरिकांच्या खात्यात एक ठराविक रक्कम जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: याबद्दल मंत्रिमंडळासोबत चर्चा करत असून ती कशा पद्धतीने लागू केली जाऊ शकते यावर विचार सुरु आहे. सध्या काही राज्यांमध्ये ही योजना लागू आहे. योजना कधी लागू केली जाईल याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या शेवटच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा होऊ शकते. तसंच निवडणुकीआधी योजना लागूही होऊ शकते असं कळत आहे.

कृषी मंत्रालयाकडूनही यासंबंधी माहिती मागवण्यात आली आहे. तसंच इतर मंत्रालयांकडून सूचना मागवण्यात आल्या असून ही योजना फक्त शेतकऱ्यांना लागू करण्यात यावी की यामध्ये बेरोजगारांचाही समावेश केला जावा अशी विचारणा करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून एक समितीही गठीत केली जाऊ शकते.

सरकारकडून युबीआय लागू झाल्यास शेतकरी आणि बेरोजगारांच्या खात्यात कोणत्याही अटीविना एक ठराविक रक्कम जमा होऊ शकते. यामुळे मुलभूत गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. सरकार गेल्या दोन वर्षांपासून या योजनेवर काम करत आहे. देशातील 20 कोटी लोकांना या योजनेत सामील करुन घेण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली फेब्रुवारी 2019 मध्ये सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात युबीआयची घोषणा करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 3:29 pm

Web Title: modi government to bring universal basic income scheme soon
Next Stories
1 इंग्लंडमधले बाललैंगिक अत्याचारी मूळचे पाकिस्तानी – साजिद जाविद
2 लिहिता वाचताही न येणारा काँग्रेसचा छत्तीगडमधील आमदार झाला मंत्री
3 इस्रोच्या कार्यालयाला आग; अग्निशामनच्या ५ गाड्या घटनास्थळी
Just Now!
X